Saturday, September 24, 2011

माझे विचार

संगणक माझा सोबती
इंग्रजी पुस्तकात धडा म्ह्णुन होता.
       त्या काळातला संगणक अत्यंत कमी स्मरणशक्ती साठ्वणारा भल्या मोठया आकाराचा होता. त्यात विशिष्ट पंचकार्ड वापरले जायचे. आता लपटाप, पामटाप असे षोटेषोटे आणी भरपुर स्मरणशक्ती असलेले संगणक जागतिक जीवनाच महत्वाच्‍ अंग होत चालले आहेत.
       या जुन्या आठवणींवर जुन्या कमी स्मरणशक्तीच्या फ्‍लापी, सीडी वापरात असणारे मोठे मोठे संगणक भंगारात जाउन षोटे षोटे जास्त स्मरणशक्ती साठ्वणारे संगण्क या भुतलावर अवतरले. स्टीव्ह जाबज याने हा संगणक स्वतःच्या वडीलांच्या गरेजात बनवला तेव्हां त्याची किंमत 666 डालर एवढी होती.
      केबी,एमबी,जीबी,टी.बी करीत संगणक स्मरणशक्ती वाढ्वत गेला. त्याचा जगातील वापरही वाढत गेला नेट,फेसबुक,आयपाड अशी उत्क्रांती ही वाढत गेली संगणाकने मानवी जीवनातली  सर्व क्षेत्र कमी वेळात व्यापुन टाकली. त्यामुळे माणसाच्या जीवन शैलीचा चेहरा मोहराच संगणकाने बदलुन टाकला.    आणी आता तर संगणकाच्या करामतीने खरा चेहराही बदलण शक्य झाल आहे. त्यामुळे त्याचा उपयोग जास्त प्रमाणात सिनेमा सृष्टीत व्हायला लागला आहे.
      आस्कर विजेते  60 वषीय अभिनेते जेफ बिजेश यांनी पुन्हा एकदा तिशीतल्या तारुण्यात नेण्याच काम संगणकाने केले आहे. त्यामुळे हा 60 वषीय म्हातारा 30शीतला तरुण म्ह्णुन चित्रपटात काम करणार आहे .आता पयंत एखादी व्यक्तीरेखा सिनेमात लहानपणापासुन वृद्धत्वापयंत दाखवताना किमान तीन जणांना ती साकारावी लागत असे आणी त्यामुळे काही बारकावे नजरेआड करावे लागत असत  संगणकातील सवात नवीन आणी धक्कादायक क्रांती आपल्या समोर आहे
      हिंदुस्थानात संगणक आला तेंव्हा परदेशात रहाणारी आपली मुल रोज रात्री आपल्याशी बोलु लागली तिथे काय करताआहेत ते घर बसल्या दिसु लागली. त्यामुळे मुल लांब गेल्याच दुःख कमी झाल. मुल घरातच असल्याचा भास होउ लागला. त्यामुळे सुखदुःख वाटता आली ही हिंदुस्थानातील्‍ आईबाबांना एक पवणीच ठरली.
जे काही मनात आहे ते संगणकामुळे दाखवु व बोलुही शकली.
      संगणकावर आपले विचार कथा, कविता,पाककृती,गोष्टी लिहिता येतात त्यासाठी प्रकाशकाची किंवा वृत्तपत्रकारांची गरज लागत नाही. प्रसिद्धिसाठी कुठल्याही माद्धमाची गरज नाही. जो संगणक वापरतो तो ती माहीती वाचु शकतो आणी आजच्या घट्केला संगणक न वापरणारा मिळणच कठिण झाल आहे त्यामुळे संगणक माणसाचा मित्र,सोबती झाला आहे.
      पुस्तक वाचा ,गाणी ऐका,चित्र काढा पत्ते खेळा किंवा इतरही विविध खेळ खेळा एकाच वेळी बर्‍याच व्यक्तींशी चाट करा स्वतःची कामे करा,हिशोब ठेवा किंवा दुसर्‍याकडुन माहीती मिळ्वा आपल्याकड्ची माहीती दुसर्‍याला पोहचवा अगदी क्षणात शक्य झाले आहे.

No comments:

Post a Comment